Posts

Showing posts from April, 2024

संतांची शिकवण

मराठी संतांची शिकवण सन्मार्गाचा प्रवास अवघड असतो, तरी पण माणुस त्या मार्गाने निघाला की आपला उद्धार निश्चित होतो. संतांची शिकवण आपल्याला सन्मार्गाची वाट दाखविते. संत कुणाला म्हणतात ? ज्यांना सत्याची अनुभूती आली, अशी देवमाणसे म्हणजे संत. सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी निर्धारपूर्वक झटणाऱ्या थोर माणसांना संत म्हटले गेले. माणसाचेच रूपांतर संतात झाले. महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ग्यानबा – तुकारामाची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक श्रीमंत संत परंपरा महाराष्ट्राला मिळाली. आपल्या मराठी संतांनी इतर प्रांतातील संतांना प्रेरणा दिली. सगळे संत आमचे आहेत, पण मराठी संत हे अधिक जवळचे आहेत. सगळ्यांना ते माझे वाटतात- कविवर्य वसंत बापट म्हणतात – कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच. जय देवाचा जय बोला परि माझ्या नाम्याचा नाच || खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा पाया तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरानी घातला आणि सतराव्या शतकात त्यावर कळस चढविण्याचे काम संत तुकारामानी केले. संत कवयित्री बहीणाबाईनी – ज्ञानद...

संतांचे कार्य आणि संतांची माहिती

  भगवान श्रीमद श्रीधर स्वामी जन्मगाव :   चिंचोळी(मराठवाडा).   जन्म : 7 डिसेंबर 1908 प्रस्तावना :  भगवान श्री मद् श्रीधर स्वामी सर्वांना परिचित आहेत. परिचय :  भगवान श्रीम द श्रीधर स्वामी यांच्या आईचे नाव कमळाबाई व वडिलांचे नाव नारायण असे होते. ते रामदास स्वामींचे उपासक होते. त्यांनी रामदास स्वामींच्या अनेक गोष्टी आचरणात आणल्या. दुसऱ्यांना मदत करणे व इतरांच्या सुखासाठी झटणे यातच त्यांना आनंद मिळत  असे. धार्मिक कार्य व शिकवण :  श्रीधर स्वामी वस्तीगृहात राहत असताना त्यांची इतरांना मदत करण्याची, इतर जणांची सेवा करण्याची वृत्ती पाहून त्यांना त्यांच्या गुरुजींनी सज्जनगडावर जाऊन आपले जनहित कार्य करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी सज्जनगडावर जाऊन पूर्ण जीवन समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण केले. ते समर्थ रामदास स्वामींचे सेवेकरी बनले. तेथे त्यांनी लोकांची सेवा केली. पुढे त्यांनी दक्षिण भारतात जाऊन प्रवचने केली. अनेक ग्रंथ लिहिले. लोकांनी सदैव सुखी राहावे, आनंदी असावे. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. समाजातील दुष्ट प्रवृत्तीं चा नायनाट व्हावा यासाठी ते सत...

संतवाणी- संतांची शिकवण

Image
  संतवाणी- संतांची शिकवण |         महाराष्ट्राच्या पावन भूमीवर सद्वर्तनाची , परोपकाराची, मित्रत्वाची, दया क्षमा शांती इत्यादी मूल्यांची शिकवण देण्यामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा म्हणजेच महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांचा फार मोठा हातभार आहे.       संत परंपरा सांगायची झाली तर यामध्ये निवृत्तीनाथ ,माऊली ज्ञानदेव ,सोपान , मुक्ताबाई , संत एकनाथ , संत नामदेव,  जगद्गुरु तुकाराम महाराज , संत सावता महाराज, संत चोखामेळा , संत शेख महंमद , जनाबाई, गोरा कुंभार ,संत रोहिदास अशी अनेक नावे घेता येतील.       यातीलच काही संतांनी लिहिलेल्या अभंगाचा अर्थ आणि त्यातून मिळणारी शिकवण  समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया.   # जगद्गुरु सतश्रेष्ठ तुकाराम महाराज #     अर्थेविन पाठांतर कासया करावे|  व्यर्थची मरावे घोकूनिया|| घोकूनिया   काय वेगी अर्थ पाहे|  अर्थ रूप राहे होऊनिया || तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी  नाही तरी गोष्टी बोलू नका           संत तुकाराम     ...